मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी गुवाहाटीला‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटेल’डायलॉग मारला होता. शहाजी पाटलांची बोलण्याची स्टाईल आणि शब्दरचना यांमुळे हा डायलॉग खुप प्रसिध्द झाला होता.दरम्यान अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हाच संवाद वापरून मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत खोचक ट्वीट केलं आहे. तानाजी सावंत हे शिंदे सरकारमधील एक मंत्री आहेत.तसेच अमोल मिटकरींनी डायलॉग सोबत तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका आता व्हायरल होऊ लागली आहे. तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यावरून आता ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे.
नेमक काय म्हणाले अमोल मिटकरीं
अमोल मिटकरींनी या दौऱ्याच्या नियोजन पत्राचा फोटो शेअर करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “हे आहेत आमचे आरोग्यमंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचं नाव? आणि काय त्यांचा दौरा? एकदम ओक्के ओक्के”.
तानाजी सावंत यांचा पुणे दौरा
अमोल मिटकरींनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिकाच शेअर करत त्यांच्या २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट यादरम्यानच्या पुणे दौऱ्याचं नियोजन नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये तानाजी सावंत २६ तारखेला दुपारी अडीच वाजता मंत्रालयातून पुण्याच्या दिशेने निघाले. त्यानंतर २७ आणि २८ ऑगस्ट या दोन दिवसांत तानाजी सावंत यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त निवासस्थान ते कात्रज, बालाजी नगर येथील कार्यालये असाच प्रवास नमूद करण्यात आला आहे.