मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँग (Koyta Gang) राडा करताना पहायला मिळत आहे. यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून देखील कोयता गँगला अजून आळा बसलेला नाही. यामुळे आता पुण्याचा बिहार (Bihar) होतोय का? असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहे. याआधी कोयता गँग वाहनांची व मालमत्तेची तोडफोड करत होती. मात्र इथेच न थांबता त्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही धमकावलं आहे. ही घटना बिबवेवाडीतील (Bibwewadi) संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडली आहे.
पुण्यातील विविध भागांत याआधी कोयता गँगच्या दहशतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. हडपसर, सिंहगड रोड, वारजे, विश्रामबाग परिसरात कोयता गँगने सळो की पळो करुन सोडले होते. हातात कोयते घेऊन ही गँग दुकानांमध्ये तोडफोड करायची. तसेच रात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करायची. या गँगने केलेल्या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तब्बल 3,765 गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.
धक्कादायक! पाच वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
कोयता गँगकडून दहशत दाखवण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी
१) गाड्या जाळणे
२) गाड्यांची तोडफोड करणे
३) विना पैसे देता जेवण करणे
४) कपडे किंवा अन्ये गोष्टी मिळवण्यासाठी कोयत्याची दहशत दाखवने
५) नागरिकांना व व्यावसायिकांना धमकवणे
च्युइंगम खाण्याची सवय असेल तर लगेच सोडा नाहीतर…
यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात तर कहर करत कोयता गँगने पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या टोळक्याने तरुणाचा मनगटापासून पंजाच तोडला होता. पुण्यातील कात्रज भागात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली. पोलिसांनी वेगवेगळी बक्षिसे लावून कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या तरी देखील त्यांची दहशत कमी होत नाहीय. यामुळे पुणे गुन्हेगारांची राजधानी होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संजय राऊत काढणार नवीन चित्रपट! नावही केले जाहीर; म्हणाले, “केरला स्टोरी सारखे…”