मुंबई : दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी सवांद साधत असतात. दरम्यान यावेळी या कार्यक्रमातून ते जळगाव (jalgav) जिल्ह्यातील चाळीसगावमधील (chalisgav) विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे.
Rahul Gandhi: काँग्रेसला धक्का! राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
आजची पंतप्रधान मोदींची मन की बात महाराष्ट्रासाठी खास असणार आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून पिएम मोदी चाळीसगावच्या विद्यार्थ्यांसोबतच (students) पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी आज नेमकं काय बोलणार? विद्यार्थी त्याच्यांशी कसा संवाद साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तसेच कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, कपडे खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वजन खादी उत्पादनाला प्राधान्य द्या. सणोत्सवाच्या काळात आपल्या नातेवाईकांना खादीपासून तयारे केलेले कपडे भेट द्या. यामुळे व्होकल फॉर लोकल चळवळ अधिक मजबूत तर होईलच तसेच यासोबत स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.