उत्तरप्रदेशमध्ये (Uttarpradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी नवरा कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला म्हणून महिलेने (Married Woman) एकटेपणा (Loneliness) दूर करण्यासाठी आपल्या दिरालाच जाळ्यात ओढले. रामपूर येथील एका विवाहित महिलेचा पती कामानिमित्त बाहेरच्या शहरात गेला होता. यावेळी एकटेपणा वाटू नये म्हणून ही महिला आपल्या दिरासोबत गप्पा-गोष्टी करू लागली.
ब्रेकिंग! समृद्धी महामार्गावर रेलिंगला धडकून कारला भीषण आग; २ जणांचा होरपळून मृत्यू
एकमेकांसोबत गप्पा मारल्याने व अधिक काळ एकमेकांच्या सहवासात राहिल्याने ही महिला आपल्या दिराच्या प्रेमात पडली. तिच्या दिराचीही काही वेगळी अवस्था न्हवती. महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांनाही तीन-तीन मुले आहेत. मात्र प्रेमात पडताना त्यांनी आपल्या मुलांचीही फिकीर केली नाही. या दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस बहरत होते. विशेष म्हणजे या महिलेच्या नवऱ्याला देखील याबाबत कसलाच सुगावा लागला नाही. या महिलेला तिच्या दिरासोबत रहायचे होते. यासाठी तिने आपल्या दिरासोबत दूर पळून जाण्याचे ठरविले.
मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार 10वीचा निकाल
एकेदिवशी रात्री हे दोघेही आपापले संसार उघड्यावर टाकून पळून गेले. यानंतर दोघांच्याही घरच्यांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते कुठेही सापडले नाहीत. दरम्यान शनिवारी (ता.२७) हे दोघेही आपल्या गावातील पोलीस ठाण्यात आले. याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक देखील तिथे आले.
याठिकाणी या दोघांनाही समजवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. मात्र दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने आपला संसार व मुलांवर पाणी सोडून दिरासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतला. दुसरीकडे दिराला देखील या महिलेसोबतच रहायचे होते. त्यामुळे पोलिसांनी देखील दोघांना सोडून दिले.
Ajit Pawar | अजित पवारांनी थेट हॉटेल मालकाला उभे केले शॉवरखाली! कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क