यंदाचा आयपीएल सिझन (IPL Season) विविध कारणांमुळे विशेष गाजला. क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी असणाऱ्या यंदाच्या आयपीएल सिझनच्या फायनल सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Gujrat Titans vs Chennai Supar Kings) यांच्यात हा सामना काल पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे. (IPL 2023 winner team)
मोठी बातमी! चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
यामुळे आयपीएल स्पर्धेतील विजेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सचे पाचव्यांदा नाव कोरले गेले आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यात आली. यावेळी वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या खेळाडूंनी चांगली सुरुवात करून दिली होती.
गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे चेन्नईला जेतेपद मिळवण्यासाठी २१५ धावांची गरज होती. दरम्यान चेन्नई सुपर किंग्सने हे टार्गेट पूर्ण करून आयपीएलमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे सीएसकेच्या चाहत्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.