
पती-पत्नी (Husband Wife) मध्ये नेहमीच भांडणे होत असतात. कधी कधी या भांडणांना एवढे गंभीर स्वरूप प्राप्त होते की, गोष्टी घटस्फोटापर्यंत (Divorse) जातात. मात्र राजस्थानच्या भरतपूरमध्ये पती-पत्नीच्या भांडणात पतीचा जीवच गेला आहे. भांडण झाल्यानंतर रागाने टॉयलेट क्लीनर (Toilet Cleaner) पिल्याने हा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
भरतपूर येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय विनोद जाटवचे त्याच्या पत्नीसोबत जोरदार भांडण झालं. विनोद रोज दारू पिऊन घरी येत होता. यावरूनच शुक्रवारी (ता.२५) विनोद व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. विनोदच्या पत्नीने त्याला दारू (Liquior) पिण्यास मनाई केली. त्यामुळे तो संतापला आणि त्याने पत्नीला धमकी दिली. भांडण सुरू असताना जास्त राग वाढल्याने विनोद रागात बाथरूममध्ये गेला. तिथे जाऊन तो टॉयलेट क्लीनर प्यायला. यामुळे त्याची तब्येत प्रचंड बिघडली. हे पाहून त्याच्या पत्नीने घरातील इतर लोकांना लगेच बोलावून घेतले. मात्र, विनोदच्या पोटात खूप जळजळ होत होती.
Rishabh Pant | ऋषभ पंतच दुसरं ऑपरेशन होणार होत मात्र…डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
यामुळे कोल्ड ड्रिंक पाजण्यात आले. दरम्यान विनोदची खराब हालत पाहून उपस्थित लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये न्हेले. मात्र हॉस्पिटलमध्ये न्हेल्यानंतर विनोदला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दारुवरून या दोन्ही पती पत्नीत सातत्याने वाद होत होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वैष्णवी देवीला जाणाऱ्या गाडीवर काळाची झडप; भीषण अपघातामध्ये १० यात्रेकरूंचा जागीची मृत्यू , ५७ जखमी