अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला (Tejashree Pradhan ) ‘होणार सून मी या घरची’ या मराठी (Marathi series) मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिने साकारलेली जान्हवीची (Janhvi) भूमिका खूप प्रसिद्ध झाली. विषेशत: स्त्रियांनी तर जान्हवीला डोक्यावरच घेतल होत. त्यानंतर पुन्हा एकदा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, 70 वर्षीय आजोबांनी स्वतःच आयुष्य संपवलं
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तिने साकारलेल्या शुभ्राच्या पात्रावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. नाटक, मराठी सिनेमेसह तेजश्री बाॅलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे. टेलिव्हिजन विश्वातील लाडकी सुनबाई म्हणून ती प्रसिद्ध आहे. तेजश्रीचा आज वाढदिवस असून तिने खूपच कमी काळात मराठी इंडस्ट्रीत तिची एक ओळख निर्माण केली आहे.
महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “शरद पवार म्हणजे अंगठा…”
तेजश्रीचा जन्म 2 जून 1988 साली झाला आहे. ती मुळची मुंबईची आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण करुन आपला कल अभिनयाकडे वळवला आहे. 2010 मध्ये ‘झेंडा’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने एकापाठोपाठ चित्र, शर्यत, उदय, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे अशा विविध चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजश्रीचे प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत.
हातानेच गुंडाळला डांबरी रस्ता, व्हीडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क