मुंबई : कोरोनाबाबत राजकीय वर्तुळातून एक धक्कादयक बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षतातून शिंदे गटात सामील होऊन बंड करणारे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ते घरीच क्वारंटाईन झाले असून त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. मंत्री संजय राठोड यांनी शनिवारी मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कोरोनाची चाचणी (Corona Test) केली होती.दरम्यान त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संजय राठोड यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
Sonali Phogat: सोनाली फोगट हत्याप्रकरणी अंमली पदार्थ विक्रेत्यासह ५ जणांना अटक
’मी आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. दुर्दैवानं ती पॉझिटिव्ह आली.तसेच डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे.तर माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास जाणवत असेल तर कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असं ट्विट संजय राठोड यांनी केलं आहे.
संजय राठोड नेहमी चर्चेत
संजय राठोड यांना महाविकास आघाडीचे सरकारमध्ये असताना त्यांना पुजा चव्हाण प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महत्वाचं म्हणजे राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनेच जोरावर धरली होती. आणि त्याच भाजप सरकारमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या राठोड यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे आता विरोधकांकडून भाजप सरकारवर तसेच संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.