दौंड : कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. काल दौंड तालुक्यातील खडकी या गावांमध्ये कृषी विभागाकडून ऊस पीक कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना उसाच्या उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. ऊस लागवडीपासून ते ऊसाची तोडणी होईपर्यंत त्याचे तण नियंत्रण, खत नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन कसे करावे याबाबत योग्य सल्ला देण्यात आला.
यावेळी, या कार्यक्रमामध्ये संजय कदम ( कृषी पर्यवेक्षक, दौंड), अतुल होले ( कृषी सहाय्यक, खडकी, दौंड), शंकर कांबळे ( कृषी सहाय्यक, स्वामी चिंचोली, दौंड) अजहर सय्यद ( कृषी सहाय्यक, मळद, दौंड) यांनी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी खडकी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.