कोल्हापूरमधील ( Kolhapur ) महिलां वटपौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये रामाचा पार येथे वडपूजा करण्यासाठी गेल्या होत्या. वडाला सूत गुंडाळल्यामुळे महिलांनी लावलेल्या अगरबत्ती आणि कापूरमुळे वडाने पेट घेतला. महिला वटपौर्णिमेची पूजा ( Vatpurnima Puja ) करत असतानाच घाबरून पळाल्या व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ओडिशा ट्रेन अपघातामुळे मृत्यूचे तांडव, ट्रेनचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
वटपौर्णिमेचा पारंपारिक उत्साह ( traditional enthusiasm ) असल्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. वटपौर्णिमेची पूजा करताना महिलांनी वडाच्या बुंध्यामध्ये अगरबत्ती व कापूर पेटवून ठेवला होता. या अगरबत्त्यांची व कापराची झळ गुंडाळलेल्या धाग्यांना लागून वडाने पेट घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे कमी पडला? अजित पवारांनी डायरेक्ट कॅमेऱ्यासमोरच सांगितलं
मंदिर परिसरामध्ये लागलेली आग पाहून तेथील नागरिक सतर्क होऊन आग विझवण्यासाठी धावले. वटपौर्णिमेचे पूजा करणाऱ्या महिलांना तेथून खाली उतरवले. मंदिरांमधील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक मशीनच्या साह्याने ही आग विझवण्यास मदत केली. व कोल्हापूर मधील मंदिरातील अनर्थ टळला. त्यानंतर महिलांना प्रशासनाकडून व देवस्थान समितीकडून कापूर व अगरबत्ती न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.