वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण असतो. वाढदिवस म्हणजे आपण या जगात आलेलो पहिला दिवस पण तोच दिवस शेवटचा झाला तर… अशीच एक घटना गोवंडी परिसरात घडली आहे. एका तरुणाचा वाढदिवस होता. त्याने मित्रांसाठी मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या एका मित्राने पार्टीत नाचण्याकरता डीजेचे आयोजन केले होते. वाढदिवस झाल्यानंतर जे घडलं ते फार भयंकर होतं.
पूजा करताना वडाच्या झाडाने घेतला पेट; महिलांची उडाली धावपळ
साबीरने वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशनसाठी तब्बल 10,000 रुपये खर्च केले होते. त्याच्या ज्या मित्राने डीजेचे आयोजन केले होते, त्याने वाढदिवस संपल्यानंतर साबीरला त्या डीजेचे पैसे देण्यास सांगितले. परंतु, साबीर जवळचे सर्व पैसे संपले होते. त्यामुळे साबीरने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे साबीरचे मित्र खूप चिडले आणि त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण खूप जोरात चालू होतं आणि साबीरला त्याचे मित्र लाथाबुक्क्या मारत होते. संशयीतांपैकी सलामतने शाहरुखकडून चाकू घेऊन साबीरच्या छातीवर वार केला होता.
गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे. साबीर अन्सारी असं त्या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दोषीला अटक झाले असून इतर दोघेजण फरार झाले आहेत. त्यातील एक दोषी अल्पवयीन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे कमी पडला? अजित पवारांनी डायरेक्ट कॅमेऱ्यासमोरच सांगितलं