ओडिशा दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासांनी रेल्वे पुन्हा सुरू!

After the Odisha tragedy, the train started again after 51 hours!

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर, पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मुख्य ‘ट्रंक लाईन’वरून खराब झालेले रेल्वेचे डबे हटवण्यात आले आहेत आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली आहे. घटनेनंतर रेल्वेमंत्री सातत्याने घटनास्थळी उपस्थित होते. रविवारी एका मार्गावरील कामकाज सुरू करण्यात आले. कामकाज सुरू झाले त्यावेळी रेल्वेमंत्री स्वत: त्या ठिकाणी उपस्थित होते. (After the horrific train accident in Odisha’s Balasore on Friday)

ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन, सिनेसृष्टीत शाेककळा

मालगाडी निघून गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी प्रथम देवाचे आभार मानले आणि नंतर लोकांशी संवाद साधताना सांगितले की, सर्वांनी खूप चांगले काम केले आहे. ज्या कुटुंबांचे लोक या दुर्घटनेत बळी पडले त्यांच्यासाठी मी खूप दु:खी आहे. मात्र या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.

अहमदनगर जिल्ह्यात सुसाट्याचा वारा, तुरळक पाऊस; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

दरम्यान, या अपघातामध्ये आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात पावसाला जोरदार सुरुवात; पावसामुळे झाली वाहतूक कोंडी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *