आज 6 जून, हा दिवस प्रत्येक शिवप्रेमीसाठी खूप खास असतो. सर्वांसाठीच हा दिवस खूप महत्त्वाचा आणि श्रद्धापूर्ण असतो. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणारे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवशी प्रत्येक जण काही ना काही तरी नवनवीन करत असतो. किल्ले रायगडावर या दिवशी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा असतो. त्या सोहळ्यासाठी प्रचंड मावळे रायगडावर उपस्थित असतात. त्याचप्रमाणे आज देखील जवळपास अडीच लाख मावळे रायगडावर जमले होते.
Odisha Train Accident । रेल्वे अपघातात प्राथमिक चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी राजे देखील रायगडावर उपस्थित होते. आज रायगडावर तारखेप्रमाणे 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळा समाप्तीनंतर खाली उतरण्यासाठी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवभक्तांनी खूप गर्दी केली होती. गर्दी प्रचंड वाढली होती, त्यामुळे कोणतेही आगळीक घडायला नको यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, गर्दी भयानक वाढली आणि त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर रायगडावरील शिवभक्तांवर सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला.
खासदार संभाजी राजे देखील अर्धा तासापासून शिवभक्तांना शिस्त पाळण्याच्या सूचना करत होते. परंतु, शिवभक्तांनी त्यांचे देखील न ऐकता खूप गोंधळ करत गर्दी केली. रायगडावरून खाली उतरताना प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीसांसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान संभाजी राजे म्हटले आहेत की, “जोपर्यंत शेवटचा शिवभक्त गडावरून खाली उतरत नाही तोपर्यंत मी खाली जाणार नाही”.
स्मार्टफोन घेताय तर थांबा! ‘असा’ स्मार्टफोन घेतल्यानंतर तुम्हालाही भोगावा लागेल 3 वर्षांचा तुरुंगवास