
स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही परिस्थितीचा सामना करत ती परिस्थिती पार करतो. आपल्या स्वप्नांना पंख फुटलीत हीच आशा मनी बाळगून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. असाच प्रेरणादायी प्रवास जळगावमधील एका युवकाने केला आहे. त्याने त्याच्या स्वप्नांशी कायम प्रामाणिक राहत यश संपादन केले आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याने येईल त्या परिस्थितीशी सामना करत हे यश मिळवले आहे.
त्या युवकाचे नाव अभिषेक पर्वते असं आहे. अभिषेक जळगाव जिल्ह्यातील ता.जामनेर येथील राहणारा एक युवक आहे. 2017 मध्ये अभिषेकने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर PSI होण्याचं स्वप्न उरी बांधून तो विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुण्यात आला. अभिषेकने 2018 मध्ये पूर्व परीक्षेचा टप्पा पार केला. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. दुर्दैवाने ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करताना अभिषेकचा खुबा सरकला. डॉक्टरांनी रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला देत त्याला एक दुःखी बातमी सांगितली की, यापुढे त्याला कधीही धावता येणार नाही. परंतु, या परिस्थितीला अभिषेक डगमगला नाही. त्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला.
अभिषेकने 2019 मध्ये सलून (Mens parlour) चालू केलं. पण कोरोनामुळे हा व्यवसाय बंद करावा लागला. पुन्हा एकदा अभिषेकला अपयश आलं. नंतर व्यवसाय नव्याने भरारी घेऊ लागला. तोच शेजारी सुरू असलेल्या बिल्डिंगच्या बांधकामामुळे त्याचं दुकान पडलं. सतत येणाऱ्या अपयशामुळे तो निराश झाला. पण तरीसुद्धा अभिषेकने पळवाट न शोधता परिस्थितीचा सामना केला. त्याचंच फळ म्हणून अभिषेक आज 3 वेगवेगळ्या व्यवसायांचा व्यवस्थितरित्या सांभाळत करतो. स्पर्धा परीक्षेत अपयश आलं तर जीवनच संपवण्याचा विचार करणाऱ्या युवकांसमोर अभिषेक आणि त्याचा कठीण प्रवास हे आत्मविश्वासाच उत्तमोत्तम उदाहरण आहे.
भर लग्नमंडपात आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ; पुढं घडलं असं काही वाचून तुम्हालाही बसेल धक्का