
भर लग्न मंडपात कितीतरी जोडप्यांची लग्न कोणत्या ना कोणत्या कारणावरून मोडतात हे आपण आधी ऐकलं असेल. अशा घटनांचे सोशल मीडियावर व्हिडिओ देखील खूप व्हायरल होतात. दरम्यान राजस्थानमधील असाच एक व्हिडिओ सध्या तुफान वायरल होतय. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका तरुणीने तरुणाला साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी विरोध केला. त्यामुळे त्या तरुणाने असं काही केलं आहे जे बघून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.
लव्ह जिहादबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “या फाजील गोष्टींना…”
ही भयानक घटना राजस्थानच्या जैसलमेरमधील मोहनगड पोलिस स्टेशनजवळील सांखला या गावात घडली आहे. या तरुणाने तरुणीला जबरदस्तीने उचलून जंगलात नेले. या अमानुष व्यक्तीने ती तरुणी लग्नाला तयार नसताना देखील तिला उचलून जंगलात नेले. तिथं आग लावत त्या तरुणीला उचलून घेऊन त्याने फेऱ्या मारल्या आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज देखील येत आहे. या घटनेमुळे आता राजकारण चालू झाला आहे.
या घटनेमध्ये समाविष्ट असणारे सर्व आरोपींना पोलिसांनी अटक न केल्यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आहे. याची दखल घेत केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram meghval) यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत ते म्हणाले आहेत की, “राजस्थानमध्ये काँग्रेसचेच राज्य चालू आहे .”
ब्रेकिंग! भंगार गोदामाला भीषण आग; नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु…
नातेवाइक म्हणाले आहेत की, मुलीची इच्छा नसताना देखील या तरुणाने तिला बळजबरीने जंगलात उचलून नेलं आणि फेऱ्या मारल्या. तो व्हिडिओ त्याने व्हायरल केला आणि त्यातून तो तिचे दुसरीकडे लग्न होऊ नये म्हणून बदनामी करत आहे. 1 जून रोजी 15 ते 20 जणांनी त्यांच्या घरासमोरून त्या मुलीला उचलून नेले, आणि फेऱ्या मारतो व्हिडिओ व्हायरल केला.
Deputy SP कैलाश विश्नोई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “आम्ही तरुणीला व आरोपी पुष्पेंद्र सिंगला पकडले आहे. तरुणीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे. मुख्य आरोपीला अटक करून त्याला जेलमध्ये रवाना केले आहे. इतर फरार आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल”. असं ते म्हणाले आहेत.
नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून कडाक्याचं भांडण; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल