ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बरेच लोक अजूनही आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. हावडा जिल्ह्यात राहणारे हेलाराम मलिक २५३ किलोमीटरचा प्रवास करून ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात पोहोचले आणि आपल्या मुलाला मृतदेहांच्या ढिगाऱ्याखालून काढून मृत्यूपासून वाचवले.
मलिकने त्याचा २४ वर्षीय मुलगा विश्वजीतला बालासोर रुग्णालयात नेले, त्यानंतर त्यांनी त्याला कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल केले. विश्वजीत गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाडांना दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर एसएसकेएम रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दोन शस्त्रक्रिया झाल्या.
याबाबत बोलताना त्याचे वडील म्हणाले, मला माझा मुलगा सापडत नव्हता. अनेक मृतदेहांमध्ये मुलगा ओळखणे अशक्य होते. मात्र अचानक मला माझ्या मुलाचा हात दिसला आणि नंतर माझ्या लक्षात आले तो माझा मुलगा आहे. यांनतर तो जिवंत असल्याचे देखील लक्षात आली. त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
लव्ह जिहादबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “या फाजील गोष्टींना…”