बिहारमधील नालंदामधून मामी आणि भाच्याच्या नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने चोरून मामीचे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून व्हायरल करेल अशी धमकी वारंवार मामीला दिली. त्यामुळे वैतागलेल्या महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, वैतागलेल्या महिलेने आत्महत्या केली आहे. हे प्रकरण बिहार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. सोमवारी (५जून) रात्री या महिलेने आत्महत्या केली आहे. मृत महिला तीन मुलांची आई आहे. तर आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त, बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत
आरोपी तीन वर्षांपूर्वी त्याच्या आजी-आजोबांच्या घरी आला होता. यादरम्यान तो आपल्या मामीच्या प्रेमात पडला होता. यावेळी त्याने मामीसोबत नको त्या भाषेत बोलणे सुरू केले. त्यावेळी मामीने त्याला अनेकदा फटकारले देखील होते. मात्र, त्याच्या वागण्यात फरक झाला नाही. तो वारंवार मामीला धमकी देत राहिला. त्याला मामीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते.
घराच्या छतावर चढला चक्क बैल, त्यांनतर घडले असे की… व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
आत्महत्येची माहिती मिळताच मृत्यू झालेल्या महिलेच्या आई-वडिलांनी घाईघाईत सासरचे घर गाठले. त्यावेळी मृत महिलेचा भाऊ देखील तिच्या घरी आला होता. त्याला बहिणीच्या मोबाईलचा पासवर्ड माहीत होता. बहिणीच्या घरी पोहोचल्यावर त्याने आधी मोबाईल तपासला, त्यात भाच्याने ब्लॅकमेल केल्याचं लिहिलं होतं. चॅटिंगमध्ये भाच्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही लिहिलं होतं.
यादरम्यान, मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर आरोपीला देखील पकडण्यात आले आहे. तसेच सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीचे म्हणणं आहे की, मृत महिला देखील त्याच्या प्रेमात होती. ती देखील अनेकदा त्याच्याबर बोलत होती. मात्र या सर्व प्रकरणावर अद्यापही सखोल माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापुर प्रकरणावरून शरद पवारांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…