मीरा-भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) एक अशी घटना घडली आहे जी, माणुसकीला हादरवून टाकणारी आहे. एका 56 वर्षीय व्यक्तीने 32 वर्षीय लिव्ह-इन रिलेशनशिप (Live in Relationship) मधील पार्टनरची हत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली आहे. त्या व्यक्तीने या स्त्रीची हत्या (A man killed woman) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मनोज साने असं त्या नराधमाचे नाव आहे. सरस्वती वैद्य असं त्या मृत महिलेचे नाव आहे. आरोपीने त्या महिलेच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर काही तुकडे भाजले तर काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असतानाच आता भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ (Chitra Vhagh) यांनी सुप्रिया ताईंना प्रतिउत्तर दिले आहे.
मनोज साने मागच्या तीन वर्षांपासून सरस्वती सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. परंतु बुधवारी शेजाऱ्यांना त्या फ्लॅटमधून घाण वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि पोलिसांनी दार तोडलं तर, आतमध्ये त्या महिलेच्या शरीराचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणावरूनच आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
‘या’ गोष्टी महाराष्ट्राच्या गौरवतेला शोभणारं नाहीत, शरद पवारांची गंभीर प्रतिक्रिया
या घटनेवरून सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, “गुन्हेगारांना आता राज्यात धाकच राहिली नाही. स्त्रियांवर घडणारे गुन्हे हे संतापजनक आहेत. त्यांचं प्रमाण देखील जास्त आहे. राज्यातील गृहमंत्र्यांनी आपापल्या खात्यांकडे लक्ष देत ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात (First Track Court) दाखल करून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी तजबीज केली पाहिजे”, असं सुप्रिया सुळे ट्वीट करत म्हणाल्या आहेत.
भीषण अपघात! कंटेनर-ओम्नीची धडक, दोन महिलांचा जागीच मृत्यू
दरम्यान सुप्रिया सुळेंच्या या ट्विटनंतर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टॅग करत म्हणाल्या आहेत की, “सुप्रियाताई तुम्ही तर सरड्याला लाज वाटेल अशा पद्धतीने रंग बदलता. एवढं सोयीस्करपणे तुमच्यातील संवेदना कशा काय जाग्या होतात?”. असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत केला आहे. “तुमच्या अगदी जवळ असलेल्या मंचरच्या मुलीला मुस्लिम तरुणाने पळवून नेलं. त्यानंतर ती अडीच वर्ष झाली तरी सापडली नाही. तेव्हा, तुमचं लाडकं सरकारच होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात जर तुम्ही लक्ष दिलं असतं तर त्यावेळी तिचे 35 तुकडे झाले नसते. वसुलीमध्ये मग्न असणाऱ्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धांजली नाही. हे केवढं मोठं दुर्दैव”, असं देखील चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
आनंदाची बातमी! मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान खात्याने दिली माहिती