मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. (Mira Road Crime)
‘या’ कारणामुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच झाला नवरा बायकोचा मृत्यू; वाचून हादराल
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे. या चौकशीमध्ये आरोपी मनोज अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. सध्या या प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती वैद्य अनाथ आहे, अशी बातमी समोर आली होती. मात्र ती अनाथ नसून आज सरस्वती वैद्य यांच्या तीन बहिणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मागितला. याबाबत डीसीपी जयंत बजबले यांनी डीएनए चाचणीनंतर बहिणींना मृतदेहाचे तुकडे देण्यात येतील, अशी माहिती दिली आहे.
Sharad Pawar । धमकी मिळाल्यांनतर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला पोलिसांवर…”
माहितीनुसार, सरस्वती ही मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. तिची आई सरस्वती लहान असतानाच गेली तर वडील सोडून गेले होते. त्यांनतर तीचे दहावीपर्यंत शिक्षण अहमदनगर येथे जानकीबाई आपटे बालिका अनाथ आश्रमात झालं. त्यानंतर ती मुंबईला आपल्या नातेवाईकाकडे बोरिवली आली होती.
झारखंडमध्ये घडली धक्कादायक घटना! कोळसा खाणीत भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी