राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही घोषणा केली आहे. काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. पण अजित पवार यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.
शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; ट्विट करून सांगितली मोठी गोष्ट
पुण्यात दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आपण नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून आता तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही…“, पाकिस्तानच्या ‘या’ बड्या प्लेयरची राहुल द्रविडवर टीका
पत्रकारांनी त्यांना नाराजी बद्दल विचारले असता ते म्हटले की, “मी अजिबात नाराज नाही अशा नाराजीच्या बातम्या देणं बंद करा. सर्वांनी मिळून निर्णय घेतला. मला वाईट वाटलं. माझी फ्लाईट होती, त्यामुळे मला काही बोलता आलं नाही. मात्र जे काही निर्णय झाले आहेत त्यामध्ये मी समाधानी आहे, असं त्यांनी म्हटले आहे.
‘Sharad Pawar | या’ कारणामुळे अजित पवार यांना पद दिलं नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं