पुणे जिल्ह्यात भाजपने लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपला (BJP) पुण्यातील कसब्यामध्ये परावभ मिळाला त्याचबरोबर मागच्या काही दिवसापूर्वी देखील कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत परावभ मिळाला. त्यामुळे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीवर विशेष लक्ष दिले आहे.
पोलिसांनी एका बंद खोलीत नेलं, बेदम मारहाण केली, कपड्यावर रक्ताचे डाग; वारकऱ्यांचे गंभीर आरोप, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल (Rahul Kul) यांच्याकडे देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Constituency) दौंड, बारामती, पुरंदर, इंदापूर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा संघावर मागच्या अनेक काळापासून पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे मात्र आता या ठिकाणी पवारांचा पराभव करण्याची जबाबदारी राहुल कुल यांना मिळाली आहे. जबाबदारी मिळताच राहुल कुल यांनी त्यांच्या कामाची सुरवात देखील केली आहे.
आळंदी वारीतील समोर आला पुन्हा एक धक्कादायक व्हिडीओ; वारकऱ्यांनी पोलिसांना..
भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख आमदार राहुल कुल यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठीकीमध्ये लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार केली आहे. या बैठकीला बारामती, पुरंदर, दौंड तालुक्यातील भाजप पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीला भाजपला बारामतीतुन विजय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग! पाकिस्तानला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका; ३४ लोकांनी गमावला जीव तर 145 जण गंभीर जखमी