सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओत एका शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थार (Mahindra Thar) या गाडीने शेती नांगरल्याचे समोर आले आहे. यामुळे याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. पुण्याच्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थार या गाडीने शेती नांगरली आहे.
सर्वात मोठी बातमी! बिपरजॉयचे ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळात’ रूपांतर, 7500 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले
सध्या या शेतकऱ्याच्या या अनोख्या नांगरणीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसत आहे. नांगरणीसाठी कोणी बैलजोडी तर कोणी ट्रॅक्टरचा वापर करत आहे. मात्र इंदापूरच्या लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याने चक्क थारनेच शेताची नांगरणी केली आहे. अनिल मधुकर तोंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पुण्यात घडली थरकाप उडवणारी घटना! धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं; महिला जागीच ठार तर चिमुकला..
अनिल तोंडे यांनी या गाडीने जवळपास एक एकर क्षेत्र नांगरले आहे. थार गाडीच्या मागच्या बाजूस नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केली आहे. “ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये गाडीने नांगरणी करण्यास जास्तीचा खर्च आला पण गाडीची कार्यक्षमता पडताळली असता गाडी दणकट आहे. त्यामुळे मी गाडी विषयी समाधानी आहे,” असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच झालं नुकसान
हे ही पाहा