
मुंबई : 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या दंगलीनंतर बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील 7 जणांचीही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 2008 मध्ये 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान या प्रकणातील दोषींना तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने (NCP) निषेध केला.
Chandrasekhar Bawankule: भाजपच राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष, बारामतीला करणार टार्गेट
यावेळी बिल्किस बानोच्या दोषींना पुन्हा गजाआड टाकण्याच्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी अशी मागणी आघाडीने पंतप्रधानांकडे केली मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, कार्याध्यक्षा संजीवनी पाटील, उपाध्यक्षा सरोज पवार, जिल्हा सचिव माधुरी पाटील, शहराध्यक्षा सरोज कदम, शारदा भामरे, वनिता सूर्यवंशी, वंदना कंदार, नीलिमा मोरे, रेना खेडकर, विमल सोनवणे, विठा बिऱ्हाडे, मीना सूर्यवंशी आदींचा निषेध आंदोलनात सहभाग होता.
निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने म्हटले आहे की, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना आपण स्त्री शक्तीचा घातलेला जागर आणि तिच्या सन्मानासाठी व्यक्त केलेल्या कटिबद्धतेचा गजर अजूनही आमच्या कानात घुमत आहे. मात्र, यावर विश्वास कसा ठेवायचा, कारण सकाळी आपले भाषण झाले आणि सायंकाळ पर्यंत बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका केल्याच्या बातम्या कानावर आदळल्या. याप्रकरणात मोकाट फिरणाऱ्या बलात्कारींना पुन्हा गजाआड करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केली.