आई आणि मुलीच नातं खूप भारी नातं असत. आई आपल्या मुलीसाठी कायम धडपडत असते. मुलीला शिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. त्यामुळे आई आणि मुलीचं नातं हे खूप मजबूत आणि भारी नातं मानलं जात. दरम्यान सध्या या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. (A girl killed her mother in Bengaluru)
नाद करा पण आमचा कुठं! इंदापूरच्या शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थारने नांगरली शेती
सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरूमध्ये एका मुलीने आईची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने आईची हत्या केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. ही घटना शहरातील मायको लेआउट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पश्चिम बंगालमधील ही मुलगी फिजिओथेरपिस्ट असून तिच्या पतीसोबत बेंगळुरू राहत होती. तिचे आईशी वारंवार भांडण होत असे. अशा स्थितीत तिने आईला झोपेचे औषध देऊन ठार केले.
सर्वात मोठी बातमी! बिपरजॉयचे ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळात’ रूपांतर, 7500 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले