राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करत होते. दरम्यान आता सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ही अटक काल रविवारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
बिग ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, टँकरला लागली भीषण आग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे असं या आरोपीचं नाव आहे. सागर हा आयटी इंजिनिअर असून त्याला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मीरा रोड हत्याकांडातील तपासात धक्कादायक माहिती उघड! ऐकून पायाखालची जमीन सरकेल
शरद पवार यांना धमकी देण्यासाठी सागरने सोशल मीडियावर 2 बनावट अक्काऊंटस तयारकेल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देताना आपली ओळख लपवण्यासाठी त्याने हे अक्काऊंटस बनविले असल्याची पोलीस तपासत माहिती मिळाली आहे. आता याबाबत सागरने नवीन खुलासा केला आहे. सागर हा अविवाहीत असून त्याचे लग्न होत नसल्यामुळे तो तणावात असल्याची माहिती आहे. लग्न होत नसल्याच्या तणावातच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या फोटोवरून पेटलेल्या वादामुळे त्याला राग आला आणि त्यातूनच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. माझा दुसरा कोणताही उद्देश्य नव्हता असे त्याचे म्हणणे आहे.
पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या अन् मृतदेह घेऊन पोहचली थेट पोलीस स्टेशनमध्ये; घटना वाचून हादराल
हे ही पाहा