
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी आमीर खानचा लालसिंह चढ्डा चित्रपट प्रदर्शित झाला होता.परंतु हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लॉप झाला.दरम्यान आता अभिनेता रणबीर कपुरचा येणारा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट देखील फ्लॉप होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेटकरी करत आहेत. याच मोठं कारण म्हणजे २०११ साली रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) रॉकस्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आपल्याला गोमांस खायला खूप आवडते, असे रणबीरने सांगितले होते. आणि सध्या हाच व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.त्यामुळे काही युजर्स शोशल मिडीयावर आपल्या कॅमेंटच्या माध्यमातून “आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही, ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाला बॉयकॉट करा”, अशी मागणी करत आहेत.
त्यामुळे ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रणवीर कपूरच्या अडचणी वाढल्या आहेत.
Karan-Tejasswi: एस्केलेटरवर करण आणि तेजस्वीने केले एकमेकांना किस; पाहा व्हायरल VIDEO
रणबीर कपूरचा ‘समशेरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही . त्यामुळे समशेरा प्रमाणेच ‘ब्रम्हास्त्र’ सुद्धा फ्लोप होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आपल्या चित्रपटांकडे त्यामुळे बॉलीवूडने आणि कलाकारांनी सध्या आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, अशा टीका विविध क्षेत्रातून होत आहेत.