अनेक तरुण तरुणींना शिकून काहीतरी मोठं होण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण घर सोडून परदेशात शिक्षणासाठी जातात. आईवडील देखील आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवत असतात. मात्र सध्या अशाच शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. लंडनच्या वेम्बली मध्ये हैदराबादच्या २७ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आल्याची माहिती समोर आली आहे.
गौतमी पाटीलच्या आईचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; पाहा video
उच्च शिक्षण घेण्यासाठी ही विद्यार्थिनी लंडनमध्ये आली होती. तेजस्विनी रेड्डी (Tejaswini Reddy) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. माहितीनुसार, एका ब्राझिलियन माणसाने या मुलीवर चाकू हल्ला केला आणि तिला ठार केलं आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
लग्नानंतर जोडपे हनिमूनला गेले मात्र त्यांच्यासोबत घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल…
तेजस्विनीच्या चुलत भावाने सांगितले की, तेजस्विनीवर हाल्लाकरणारा ब्राझिलियन माणूस होता. आठवडाभरापूर्वीच तो इथे रहायला आला होता. तेजस्विनी मास्टर्सची पदवी घेण्यासाठी मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून लंडनमध्ये आली आहे. याबाबत ANI ने हे वृत्त दिलं आहे.
खळबळजनक! बारामतीत आढळला अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह
हे ही पाहा