आपल्या देशाच्या संविधानात धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या तत्त्वाचा स्वीकार केला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून विविध जातीधर्माचे आणि पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, अजूनही काही ठिकाणी जातीभेद पाळला जातो, त्यासाठी गुन्हे देखील दाखल होतात. अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे उघडकीस आली आहे.
Pune । पुण्यात घटना धक्कादायक प्रकार, पीएमपीएमएल बस गेली चोरीला
आपला जावई आपल्या समाजातील (जात) नसल्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीने आपल्या मुलीचं दुसरं लग्न (marriage) लावून दिलं आहे. वडिलांनी चक्क लग्नं झालेल्या मुलीला छत्तीसगडमधील (Dhattisgarh) अंतागड शहरातील दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडलं. या प्रकरणातील पीडित मुलीनं आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार केली आहे.
शरद पवार, गुलाबराव पाटील यांचा एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण
पीडित मुलीनं वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बंड करून आपल्या पहिल्या पतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिनं तिच्या दुसऱ्या नवऱ्याला राखी बांधून पती-पत्नीचं नात संपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, दुसरा पती आपला छळ करत असल्याचा आरोपही तिनं केला आहे. तरूणा शर्मा असं या प्रकरणातील मुलीचं नाव असून तिनं राजस्थानमधील बालेसर येथील सुरेंद्र सांखला याच्याशी लग्न केलं होतं.
सुरेंद्र (Surendra) आणि तरूणा प्राथमिक शाळेत असताना एकमेकांचे वर्गमित्र होते. महाविद्यालयीन शिक्षण (education) पूर्ण केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला तरूणाच्या वडिलांचा विरोध होता. कारण सुरेंद्र त्यांच्या जातीतील नव्हता. लग्नानंतर 10 दिवसांनी तरूणाच्या कुटुंबीयांनी या जोडप्याचा शोध घेऊन बालेसर पोलीस ठाण्यात आणून कुटुंबानं जोडप्याला जबरदस्तीनं वेगळं केलं.
हे ही पाहा –