Ajit Pawar । विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे कामांमुळे तसेच वक्त्यव्यांमुळे सतत चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या असेच ते चर्चेत आले आहेत परंतु त्यांच्या वक्त्यव्यांमुळे नाही तर एका कृतीमुळे. एका कार्यक्रमांदरम्यान वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धनुष्यबाण हातात घेतले होते. राजकारणात (Politics) अचूक नेम साधणाऱ्या पवारांनी यावेळी अचूक नेम साधला. त्यांच्या या कृतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
धक्कादायक! पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश
अजित पवार हे बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. त्यांनी एन्व्हायरमेंट फॉर्म ऑफ इंडिया (Environment Form of India) संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हॅपी स्ट्रीट कार्यक्रम या संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी वेगवगेळ्या खेळांचे आयोजन केले होते. या खेळाचा मोह अजित पवार यांना आवरला नाही. त्यांनी धनुष्यबाण हातात घेऊन अचूक नेम साधला. हा नेम राजकीय नेम नव्हता तर तो त्यांच्या लक्ष्यावर होता.
धक्कादायक! ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू
यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले की, ‘निसर्ग संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचं काम कौतुक करण्यासारखे आहे. शहरातील विकास कामांत अदृश्य शक्ती आहे. अनेक हात यामागे राबत असून बारामती बदलत आहे. रस्त्याचे काम हा पहिला प्रयोग आहे. याला तुम्हीही मोलाची साथ देत आहे. तुमचीही काही जबाबदारी आहे त्यामुळे झाडे लावा, त्यांचे संगोपन करा.
Panjab Dakh । पंजाबराव डख यांच्या अंदाजामुळे समर्थक आणि विरोधक आमने-सामने, सोशल मीडियावर घमासान सुरु