एका खासगी रुग्णालयात महिला पेशंटसोबत विनयभंग (Women molestation) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच गोवंडी (Govandi) परिसरात असणारे आदर्श नर्सिंग होम बेकायदेशीर आहे, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे नर्सिंग होमच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुंबई (Mumbai) उपनगरात गोवंडी येथे ही घटना घडली आहे. पीडितेचा पती आपल्या पत्नीला रुग्णालयात घेऊन गेला होता. तो वेटिंग एरियामध्ये थांबला होता. पत्नी बराचवेळ OPD च्या बाहेर नसल्याने तो पाहण्यासाठी आतमध्ये गेला. तर त्याने डॉक्टरला विनयभंग करताना रंगेहाथ पकडले.
Manisha Kayande । अखेर मनिषा कायंदे यांनी सोडलं मौन; पक्ष सोडण्याचे सांगितले ‘हे’ मोठे कारण
त्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी डॉ इरफान सय्यद आणि कर्मचारी शोएबला अटक केली आहे. तसेच त्यांच्या एका साथीदारांचा शोध सुरु आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील एका आरोपीकडे वैद्यकीय डिग्री नाही. दरम्यान राज्यात अजूनही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
Sharad Pawar | शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, दंगली घडवण्यामागे..