लग्नाचा (Marriage) सोहळा हा कोणत्या सणापेक्षा कमी नसतो. या दिवसाची आठवण कायम लक्षात राहावी यासाठी अनेकजण विविध गोष्टी करत असतात. परंतु काहीवेळा लग्नात अशा काही गोष्टी घडतात ज्यावर पश्चाताप करण्यापलीकडे कोणता पर्याय नसतो. अशीच काहीशी घटना केरळमध्ये (Keral) घडली आहे. ज्यामध्ये नवरी सासरी न जात थेट तुरुंगात गेली आहे. वाचून तुम्हीही हैराण झाला असालच ना. (Latest Marathi News)
बसचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर 70 जण जखमी
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना केरळ येथील कोवलममधील मंदिरात घडली आहे. या मंदिरात एक जोडपे आंतरजातीय विवाह करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन नवरीला फरफटत आणण्याचा प्रयत्न केला. तरुणाने यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याचेही ऐकले नाही. त्याला मारहाण देखील केली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
मित्रांसोबत केक कापत होता बर्थडे बॉयच्या चेहऱ्याने घेतला अचानक पेट, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
दरम्यान या तरुणीचे नाव अल्फिया तर तरुणाचे अखिल असे नाव आहे. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध करताच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले असून सदर तरुणीने माझे वय 18 वर्षे असून आमचे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या लग्नाला परवानगी देण्याची मागणी केली. तसेच याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांनी खरंच बळाचा वापर केला का? याचा तपास घेण्याचे आदेश दिले आहेत.
मोठ्या दवाखान्यात बोगस डॉक्टरने महिला पेशंटसोबत केलं नको ते कृत्य; घटना वाचून बसेल धक्का