सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, अपक्ष आमदार गीता जैन यांनी महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचे दिसत आहे. गीता जैन या मीरा भाईंदरमधील सरकार समर्थक आमदार आहेत. अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला विरोध करताना त्यांनी अभियंत्यांसोबत वाद घातला असून त्याला मारहाण देखील केली आहे.
लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ
सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मारहाण केलेली स्पष्टपणे दिसत आहे. गीता जैन यांनी संबंधित घटनेवर एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर, ‘या’ दिवशी होणार लेखी
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “त्या ठिकाणी एका महिलेचं घर जात होत ती रडत होती मात्र अभियंता हसत होता. त्यामुळे मला त्याचा राग आला. आणि संतापून माझा हात सुटला. असं त्या म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, “माझ्याविरोधात तक्रार झाली तर मी झेलायला तयार आहे. मात्र महिलेचा अपमान मी जराही सहन करु शकणार नाही. असं त्या म्हणाल्या आहेत.
Delhi । दिल्लीत मेट्रोमध्ये तरुणीने केले असे कृत्य की.., व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल