Rain Update | मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात कधी कडाक्याचं ऊन पडत आहे तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस (Rain) कधी होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी दिवसेंदिवस लांबणीवर जात आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) राजा चिंतेत दिसत आहे. (Latest Marathi News)
21 जून ही तारीख उजाडली आहे तरीदेखील पाऊस कुठेच पडलेला दिसत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधूक सुरु झालीय. दुष्काळ पडतो की काय? अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टी घडत असतानाच हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली थेट कानाखाली; व्हिडीओ व्हायरल
हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 72 तासांत म्हणजेच तीन दिवसात मान्सून हा मुंबई आणि पुणे शहरात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या तीन दिवसांत मान्सून हा मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये दाखल झालेला असेल.
धक्कादायक! तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधला अन् लावलं कुत्र्यासारखं भुंकायला; कारण जाणून तुम्ही हादराल