आपल्या देशाचा पंतप्रधान (Prime Minister) कोण? असे जर तुम्ही एखाद्या अंगणवाडीतल्या मुलाला जरी विचारलं तरी त्याला त्याचे उत्तर येईल. परंतु पंतप्रधानांचे नाव सांगायला आले नसल्याने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (UP) गाझीपूरमधील नसीरपूर गावात घडली आहे. हे प्रकरण इथवरच संपले नाही, त्या नववधूने बंदुकीचा धाक दाखवत लहान भावाशी संसार थाटला आहे. (Latest Marathi News)
शरद पवारांना मोठा धक्का बसणार? जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; राजकीय घडामोडींना वेग
मिळालेल्या माहितीनुसार, नसीरपूर गावातील रहिवासी असणाऱ्या शिवशंकर राम यांचे करंडा येथील बसंत पट्टी येथे राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न जमले होते. लग्नाची तारीख 11 जून ही निश्चित केली होती. लग्नही थाटात पार पडले. लग्नानंतर घेतलेल्या कार्यक्रमादरम्यान वराला वधूच्या बहिणेने देशाचे पंतप्रधान कोण? (Prime Minister of India) कोणालाही उत्तर येईल असा गमतीशीर प्रश्न विचारला. परंतु बराच वेळ वराला याचे उत्तर आलेच नाही. त्यामुळे वधूचे कुटुंबीय त्याच्यावर चांगलेच संतापले.
संतापलेल्या नववधुने पंतप्रधानांचे नाव सांगायला नाही म्हणून चक्क लग्नच मोडले. परंतु हे प्रकरण इथपर्यंत थांबले नाही. नववधुने बंदुकीचा धाक दाखवत थेट वराच्या लहान भावासोबत लग्न केले. याला वराच्या वडिलांनीही खूप विरोध केला, परंतु नववधू त्याला जुमानली नाही. त्यानंतर वराच्या मंडळींनी तक्रार दाखल केली.