खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) कायम चर्चेत असतात. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) हे दोघे कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. सध्या उदयनराजे भोसले टीकेमुळे नाही तर त्यांच्या एका धक्कादायक कृतीमुळे चर्चेत आले आहेत. (Latest Marathi News)
उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन कार्यकर्त्यांनी उधळून लावल आहे. या ठिकाणी आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं. मात्र ते उधळून लावल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Salman Khan । ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “मला कुत्र्यासारखं…”
आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं. मात्र आज सकाळी नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत भेट देत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवारांना मोठा धक्का बसणार? जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; राजकीय घडामोडींना वेग