दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2023) साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी योग्य दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज तसेच अन्य ठिकाणी देखील योग दिवस साजरा केला जातो. दरम्यान, आज म्हसोबाच्या वाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा योग दिन साजरा करण्यात आला.
ब्रेकिंग! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानी योगा केला तर सर्वांचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त म्हसोबाच्या वाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सन्मानीय श्री संदीप मारुती चांदगुडे आणि ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र राऊत आणि सर्व शिक्षक स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पशुखाद्यही महागले
यावेळी उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस संदीप चांदगुडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य दिनाचे महत्व देखील सांगितले.
एसटीचा प्रवास करणं बेतलं जीवावर, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकाचा मृत्यू