Eknath Shinde: वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना, जनतेला दिल्या मंगलमय शुभेच्छा

At Varsha Bungalow, Chief Minister Eknath Shinde installed Gana Raya, gave auspicious wishes to the people

मुंबई : खूप दिवसांपासून आपण सगळेचजण बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत होतो. आज अखेर ती प्रतीक्षा संपली आहे आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्यात प्रत्येक घराघरात गणपती बाप्पांचं (Ganpati bappa)भक्तीभावाने आगमन धूमधडाक्यात होत आहे. याच आनंदाच्या वातावरणात जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde)म्हणाले की, “राज्यातील तमाम गणेश भक्तांना(ganpati lovers) गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”. तसेच यासोबतच पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदेंसोबत खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant shinde) आणि त्यांच्या सहकुटुंब गणरायांची आरती केली.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी देखील सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “आज श्री गणेश चतुर्थी. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *