राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा (Darshana Pawar) मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. पुढे तपासात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरून टाकले आहे.
दर्शनाचा मृतदेह सापडून तीन दिवस झाले तरी देखील तिला कोणी मारले याबाबत अजूनही पोलिसांना तपास लागलेला नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता याप्रकरणी मराठा समाजातही संतापाची लाट पसरली आहे. दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. सकल मराठा समाजाने आज कोपरगावात मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला अनेक लोकांनी सहभाग करावा असं आव्हान देखील करण्यात आलं आहे.
या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची मागणी –
याबाबत ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलं आहे की, “राजगडावर दर्शना पवार या तरूणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्याचा तातडीने पोलीसांनी शोध घेतला पाहिजे. तसेच हे प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवावे. जे कोणी आरोपी असतील त्यांची गय करता कामा नये.” असं ट्विट करत ते म्हणाले आहेत.