सर्वात मोठा सागरी अपघात 14 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री झाला. यामध्ये टायटॅनिक (Titanic) अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) बुडाले होते. यात एकूण 2200 प्रवासी होते तर त्यापैकी 1500 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला 100 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी आजही टायटॅनिक बुडाली जागा आणि टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात पैसे करून जात असतात. अशीच एक टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी गेली होती, परंतु माघारी आलीच नाही.(Marathi Latest News)
‘शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर घेऊन गेला अन्..’; दर्शना पवारच्या हत्याकांडाच कारण वाचून हादराल
मिळालेल्या माहितीनुसार, या पाणबुडीत पाच प्रवासी होते. ती रविवारपासून उत्तर अटलांटिक समुद्रातून बेपत्ता झाली असून सध्या तिचा शोध सुरु होती. सध्या आता याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. बेपत्ता टायटन पाणबुडीतील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं जहाज ऑपरेट करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. यातील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग! बस आणि मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार
याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी OceanGate ने श्रद्धांजली वाहिली आहे. या पाणबुडीतील लोक टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते, मात्र तिथे त्यांचा संपर्क तुटला. आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, 18 जून रोजी OceanGate कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती.
धक्कादायक! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; व्हिडीओ व्हायरल