Shashi Tharoor: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांच नाव चर्चेत, पण…

Shashi Tharoor's name is in discussion for the post of Congress president, but...

दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी मागील काही दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला होता. दरम्यान अशातच आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची (Party President)निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे.तसेच महत्वाची बाब म्हणजे २२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची (ekection)अधिसूचना जारी होणार आहे.आणि २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. तर पक्षाच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते? कोणत्या गणपतीचा काय आहे विशेष? जाणून घ्या माहिती!

या नेत्यांची नावे चर्चेत

अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर(shashi tharur) हे देखील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान त्यावर आता शशी थरुर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले शशी थरुर

शशी थरुर यांनी सांगितलं की, “पुढील तीन आठवड्यांत सर्व काही स्पष्ट होईल. तेव्हाच मी यावरती स्पष्टीकरण देऊ शकेल.पण आत्ता मी निवडणूक लढणार की नाही ते सांगणार नाही.पण येवढं मात्र खर आहे की, लोकशाही पध्दतीने कारभार चालत असलेल्या पक्षात निवडणूक नेहमीच चांगली असते.”
पुढे शशी थरुर गांधी कुंटुबातील सदस्य निवडणूक लढवणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, “गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असणे पक्षाच्या हिताचे आहे. नवीन अध्यक्ष पक्षाला नवसंजीवनी देईल. ज्याची काँग्रेसला नितांत गरज आहे.”

Swapnil Joshi: मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाच धूमधडाक्यात आगमन, पाहा पारंपरिक मूर्ती आणि सजावटीतला साधेपणा

राहुल गांधींना अध्यक्षपदाच्या जबाबदारीत रस….

राहूल गांधींच्या नावाला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी पहिली पसंती देण्यात आली आहे. परंतु, राहुल गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यात कोणताही रस असल्याचे दिसून येत नाही.तसेच गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस हा लोकशाही पक्ष

तिरुअनंतपूरममध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रचारानिमित्ताने काँग्रेसचे नेते जयराम रमेश आले होते.यावेळी ते म्हणाले की,
“काँग्रेस अध्यपदासाठीची निवडणूक कोणीही लढवू शकतो. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, ते लढवू शकतात. काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे.१७ ऑक्टोबरला पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *