Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टाने बजावले समन्स, अडचणीत होणार वाढ

Actress Jacqueline Fernandez summoned by Patiala House Court, trouble will increase

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)नेहमी तिच्या अभिनय आणि फोटोशूटमुळे प्रसिद्ध असते. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी जॅकलिनच नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग (money laundering)प्रकरणात चांगलेच चर्चेत आलं होतं. मनी लँड्रिंग प्रकरणी तिचे नाव ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar)याच्याशी जोडलं गेले होते.दरम्यान आता जॅकलिनच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Shashi Tharoor: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांच नाव चर्चेत, पण…

कारण आता पटियाला हाऊस कोर्टाने ( Patiala House Court)जॅकलिनला २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात समन्स बजावलं आहे. दरम्यान तिला 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या आधीदेखील ईडीने जॅकलिनची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने तिच्यावर 200 कोटींचं आरोपपत्रही दाखल केलं होतं.

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा लालपरितून प्रवास करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद, चार दिवसात ‘एवढ्या’ नागरिकांनी केला प्रवास

यासोबतच ईडीने सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. परंतु जॅकलिननं स्वतः वर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं होतं.ईडीने आरोपपत्रात दावा केला होता की सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *