बऱ्याच प्रतीक्षेनंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होताच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यभर पावसाचं आगमन झालं आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान मुंबईसह पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्येच आता हवामान विभागाने पुण्यातील पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
शेतातून घरी चालल्या होत्या काळाने घातला घाला, एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू; गावावर शोककळा
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरामध्ये बुधवारपर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर डोंगर माथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंनी सांगितली राजकीय स्थिती, 11 महिन्यात इतकं तर मग आगामी काळात…
#Pune rains tula 5.30 pm since morning. pic.twitter.com/WRRUrV14dk
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2023
पुणे वेधशाळेच्या म्हणण्यानुसार, पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होणार आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असून आणखी 5 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, पुन्हा एक भीषण अपघात; कार थेट पडली अंडरपासमध्ये