मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनची क्रिकेटप्रेमींमध्ये अजूनही तेवढीच क्रेझ आहे. आजही क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकरच (Sachin Tendulkar) नाव सहज आठवत. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चा बराच काळ लोटल्यानंतर , क्रिकेटचा देव पुन्हा बॅट हातात घेन्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. “रोड सेफ्टी वर्ल्ड” सिरीजच्या दुसऱ्या हंगामाच्या निमित्ताने हा योग घडून येणार असल्याने क्रिकेट प्रेमींची या स्पर्धेकडे लक्ष लागून आहे.
कधी होणार सिरीजला सुरवात?
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतील. सचिन तेंडुलकरसोबतच युवराज सिंगदेखील भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. याआधीही सचिन तेंडुलकरने “रोड सेफ्टी वर्ल्ड” सिरिजाच्या पहिल्या हंगामात सहभाग नोंदवून भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात देखील पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. सचिनसोबत नमन ओझा, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा तसेच युवराज सिंगसह इतर खेळाडूदेखील दिसनार आहेत.
पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते? कोणत्या गणपतीचा काय आहे विशेष? जाणून घ्या माहिती!
या सिरीजसाठी सर्व खेळाडू ७ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे जमणार आहेत. त्यानंतर १० ते १५ सप्टेंबर पर्यंत येथे सुरुवातीचे पाच सामने खेळवले जातील. त्यानंतर पुढचे पाच सामने १६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत जोधपूर येथे होणार आहेत. त्यानंतर कटक येथे २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण सहा सामने खेळवले जातील. तर बाद फेरीचे सामने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात होतील. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात एकूण सात संघांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी न्यूझीलंड लिजेंड्स या आणखी एका संघाचा समावेश होणार आहे. म्हणजेच या हंगामात इंडिया लिजेंड्स, ऑस्ट्रेलिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, इंग्लंड लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स असे एकूण आठ संघ सहभागी होतील.