मुंबई : मंगळवारी बुलडाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या समोरच ही मागणी करण्यात आली आहे. “खरी शिवसेना आमचीच आहे “श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना युवा सेना अध्यक्ष करा!” असे प्रतापराव जाधव म्हणाले.
आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रींकात शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी, एवढी माझी मागणी आहे, असं वक्तव्य त्यांनी केल आहे. इतकंच नव्हे तर खरी शिवसेना आमचीच आहे, असंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही मागणी केल्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी थेटपणे यावर भाष्य करणं टाळलं. बुलडाण्यातील सगळेच शिवसैनिक आपल्याला भेटायला आहेत. त्यांत युवा कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आहेत. त्यांना शिवसेना वाढवायची आहे. त्यासाठी ते सगळेजण प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.
Shashi Tharoor: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांच नाव चर्चेत, पण…
सिने नायकाची उपमा देऊन एकनाथ शिंदेंच कौतुक!
एकनाथ शिंदे हे नायक चित्रपट सारखे मुख्यमंत्री आहेत, अशा पद्धतीची उपमा देत, प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खासदार प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचं भाष्य केलं होतं. ते असे म्हणाले की, 60 : 40 हा फॉर्मुला वापरत आगामी काळात शिंदे गट आणि भाजप एकत्रच निवडणुकीला सामोरे जाईल. या आधी भाजपचे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकला चलो चा नारा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण होतं. त्यानंतर अखेर प्रतापराव जाधव यांनी भाजपसोबतच्या फॉर्म्युल्यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.