राज्यातील राजकीय नेत्यांच्या हल्ल्याचे सत्र थांबता थांबत नाही तोवर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे (Bhaskar Khursange) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत त्यांची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. हा हल्ला त्यांच्या घरी पहाटे ३ वाजता करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार,’ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील घरात भास्कर खुरसंगे आणि रिद्धी खुरसंगे आणि त्यांची पुतणी विथिका राजेश खुरसंगे यांच्यावर दोन अज्ञात तरुणांकडून हल्ला केला. हल्लेखोरांनी विथिकाचा गळा आवळून तिच्या छातीवर पोटांवर आणि मांड्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.
शरद पवारांच्या ‘त्या’ टीकेचा घेतला फडणवीसांनी खरपूस समाचार, म्हणाले; ‘त्यावेळी मी..
त्यानंतर हल्लेखोर दुसऱ्या मजल्यावरून पळून गेले आहेत. यावरून आता भास्कर खुरसंगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी माझ्या वाढदिवसाचे बॅनर फाडले होते. आमचा कोणासोबत वाद झाला नव्हता. आमच्यावरील हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया खुरसंगे यांनी दिली आहे.
‘केसीआर यांच्या दौऱ्यामागे राजकीय कारस्थान’, ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ