सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे लग्नाविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावरही (Social media) सुरु असतात. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 4 दिवस अगोदर पळून गेलेल्या तरुणीसोबत तिच्याच प्रियकराने शारिरीक संबंध ठेवले आणि मग यानंतर त्याने तिला लग्नाला नकार दिला. ही धक्कदायक घटना झारखंडच्या (Jharkhand) पलामूमध्ये घडली आहे. (Latest Marathi News)
संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाकी पोलीस ठाणे हद्दीतील परसिया गावात ही घटना घडली आहे. या गावातील पंकज नावाच्या मुलाचे या तरुणीवर प्रेम होते. दोन वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. पंकजने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, परंतु तो लग्नासाठी टाळाटाळ करत होता. त्याच वेळी तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले. (Crime News)
धक्कादायक! ठाकरे गटातील नेत्याच्या घरात घुसून हल्ला
याची माहिती पंकजला मिळाल्याने त्याला ते पटले नाही. त्याने त्या तरुणीला पुन्हा लग्नाचे आमिष दिले. ते दोघेही दिल्लीला पळून गेले. तेथे त्याने शारिरीक संबंध ठेवले. परंतु त्यानंतर त्याने तिला लग्नासाठी नकार दिला. तर दुसरीकडे ती पळून गेल्याने तिचे लग्नही मोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पंकजविरोधात पाकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्ररीवरून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.