राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेत्यांना मोठी संधी देण्यात येत नाही, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) होते, याची आठवण शरद पवार यांनी फडणवीसांना करून दिली. (Latest Marathi News)
‘पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे’, सामानातून सरकारवर बोचरी टीका
मागील काही दिवसांपूर्वी एका आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नाही. मला आता संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्षपदावर राहून पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त काम करता येऊ शकते, असे पवारांनी बोलून दाखवले होते. तसेच छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मागणी केली होती.
Darshana Pawar । ‘अगोदर कटरने गळा चिरला, मग दगडाने डोकं ठेचलं..; राहुलने दिली खुनाची कबुली
त्याच मुद्द्यावरून फडणवीसांनी राष्ट्रवादीमध्ये ओबीसी (OBC) नेत्यांना संधी दिली जात नसल्याचा आरोप केला होता. त्यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते, याची आठवण फडणवीसांना करून दिली. तसेच मधुकर पिचड, सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यपातळीवर नेतृत्व केले असल्याचे पवारांनी सांगितले.
धक्कादायक! वरात दारात आणि प्रियकारसोबत पळाली तरुणी, शारिरीक संबंध ठेवले अन्..