ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा भिडले, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

Shivsena

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षभरापूर्वी ४० आमदारांसह शिवसेनेची (Shivsena) साथ सोडली. त्यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे समीकरण बदलले आहे, अनेक नेते, कार्यकर्ते पक्षांतर करत आहे. राज्यात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. कायम या दोन्ही गटांमध्ये जुंपल्याचे दिसते. अशातच आता पुन्हा एकदा कल्याणमध्ये (Kalyan) ठाकरे गट आणि शिंदे गट (Thackeray vs Shinde) आमने सामने आला आहे. (Latest Marathi News)

खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गाडी किल्ल्यावर (Durgadi forts) हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी हिंदु भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध करण्यात येतो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश मिळावा यासाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येते.

मिंधे गटातील बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ चे प्रयत्न सुरु; ठाकरे गटाची जहरी टीका

यावर्षीही शिंदे गट व ठाकरे गट या दोन गटांकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन केले जात आहे. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याने या आंदोलनाला गालबोट लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

अर्रर्र.. टोमॅटोने पार केली शंभरी, पण शेतकऱ्यांना मिळतोय फक्त ‘इतकाच’ भाव

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *