एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. तेव्हापासून ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश करू लागले आहे. दरम्यान आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
“फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
महत्वाचं म्हणजे, या चर्चांवर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार”, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांच्या प्रश्नावर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राहुल कनाल खरंच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.
सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी
त्याचबरोबर याबाबत राहुल कनाल यांनी याबाबतच्या चर्चांवर देखील उत्तर दिल आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी माझा निर्णय लवकरच सांगणार आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राहुल कनाल यांच्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
जेवण तयार केले नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला डांबले आणि केले भयानक कृत्य
हे ही पाहा –