राज्यात मंत्रिमंडळाचा (State Cabinets) विस्तार केला नसल्याने शिंदे फडणवीस सरकारला टीकेला सामोरे जावे लागत होते. परंतु आता मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपद दिली जाणार असून याच पार्शवभूमीवर काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेले होते. त्यांनी याबाबत तीन ते चार तास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा केली. (Latest Marathi News)
Sushant Singh Rajput Case । सुशांतच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा! अमेरिकेत लपले मृत्यूचे पुरावे?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीन मंत्रिमंडळात महिलांनाही संधी दिली जाणार असे बोलले जात आहे. शिंदे गटातील दोन नेत्यांसाठी राज्यातील दोन मंत्र्यांना डावललं जाणार आहे. त्यामुळे आता हे दोन मंत्री कोण? त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
कौतुकाचा वर्षाव होताना लेशपाल जवळगे याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला,’ मी शेतकरी कुटुंबातला…’
काल दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीदरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख फिक्स केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? शिंदे गटासाठी कोणत्या दोन मंत्र्यांना वगळले जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांना वगळलं जाणार